Ad will apear here
Next
‘व्यसनमुक्तीसाठी शासकीय विभागांनी कृतीशील व्हावे’


गडचिरोली : ‘गडचिरोली जिल्ह्याच्या दारू व तंबाखूमुक्तीसाठी प्रमुख शासकीय विभागांनी कृतीशील व्हावे. विभागात असणारे व्यसनी कर्मचारी, लाभार्थी यांच्यासाठी कार्यक्रम आखावा,’ असे प्रतिपादन मुक्तिपथ अभियानाचे सल्लागार डॉ. अभय बंग यांनी केले.

दारू व तंबाखूमुक्त गडचिरोली जिल्हा विकास कार्यक्रमाअंतर्गत आयोजित केलेल्या एकदिवसीय नियोजन बैठकीत ते बोलत होते. या वेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह व विविध विभागांचे जिल्हा स्तरावरील अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी लागू झाली आहे. सुगंधित तंबाखूवर बंदी असतानाही या भागात ‘खर्रा’ हा तंबाखूजन्य पदार्थ खाण्याचे व त्यामुळे रोग होण्याचे प्रमाण गडचिरोली जिल्ह्यात जास्त आहे. या पार्श्वभूमीवर २०१६पासून गडचिरोली जिल्ह्यात दारू व तंबाखूमुक्तीसाठी डॉ. बंग यांच्या पुढाकाराने ‘मुक्तिपथ’ हे अभियान सुरू करण्यात आले. सर्च, महाराष्ट्र शासन, टाटा ट्रस्ट व गडचिरोली जिल्ह्याच्या जनतेच्या एकत्र प्रयत्नातून हे अभियान सुरू आहे. याच अभियानासाठी सर्व शासकीय विभाग प्रमुखांची नियोजन बैठक १२ जुलै रोजी डॉ. बंग, जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या उपस्थितीत घेण्यात आली.

या वेळी डॉ. बंग म्हणाले, ‘शासकीय विभागातील कर्मचाऱ्यांना दारू व तंबाखूपासून दूर करण्यासाठी समज व उपचार या माध्यमातून प्रयत्न व्हावा, यासाठी शासकीय अधिकाऱ्यांनी पावले उचलावी. शासकीय विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यालयाच्या परिसरात १०० मीटर अंतरामध्ये दारू किंवा खर्रा विक्री होणार नाही, तसेच आपल्या कार्यक्षेत्रात दारू व तंबाखूमुक्तीसाठी काय करता येईल, याचे नियोजन करावे.’

जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनीही जिल्ह्यात ‘खर्रा’चा प्रश्न मोठा असल्याचे सांगून जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्व प्रशासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांनी आपली सर्व कार्यालये आणि कर्मचारी दारू व तंबाखूमुक्त राहतील यासाठी प्रयत्न करावेत व तशा कृती कार्यक्रमाची आखणी व अंमलबजावणी करावी,’ असे आवाहन केले.

‘आरोग्य, शिक्षण, ग्रामीण विकास, पोलिस अशा व्यापक काम करणाऱ्या विभागांनी आपल्या कार्यक्षेत्रात दारू व तंबाखूमुक्तीसाठी प्रयत्न करावेत; तसेच पुढील १५ दिवसांत जिल्हास्तरावरील कार्यालयापासून ते अगदी सर्वात खालच्या कार्यालय, शाळा, पीएचसी व तिथल्या कर्मचारीवर्गासाठी संबंधित विभागाने जिल्हास्तरावरून दारू तंबाखूमुक्तीबाबतचे वार्षिक नियोजन करावे,’ असे निर्देश शेखर सिंह यांनी दिले आहे. 

(गडचिरोलीचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचा बैठकीदरम्यान मार्गदर्शन करतानाचा व्हिडिओ सोबत देत आहोत)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/NZSUBQ
Similar Posts
बहिणींनी पोलिसांकडे मागितली गावातील दारू बंद करण्याची ओवाळणी गडचिरोली : हातात पूजेचे ताट, दिवा, राख्या, मिठाई घेऊन कुठे ४०, कुठे ५०, तर कुठे ७० बहिणी पोलिसांना राखी बांधायला गेल्याचे चित्र जिल्ह्यातील अनेक पोलीस स्टेशनवर दिसत होते. नक्षलग्रस्त अशी ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात रक्षाबंधनाचे औचित्य साधून गावांमधील बहिणी पोलिसांना राखी बांधायला आल्या होत्या. या
‘आमिषांना बळी न पडता निर्भयपणे मतदान करावे’ गडचिरोली : ‘१२-चिमूर-गडचिरोली लोकसभा मतदारसंघात ११ एप्रिल रोजी होणाऱ्या निवडणुकीत मतदारांनी कोणत्याही प्रकारच्या आमिषांना बळी न पडता निर्भयपणे मतदान करावे,’ असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले.
‘मानव सेवा हीच ईश्वर सेवा’ गडचिरोली : ‘आपले जीवन जगण्यासाठी आणि त्याची उंची वाढविण्यासाठी मानवाला गरज असेल, तर परमात्मा एक हे मार्ग स्विकारणे गरजेचे आहे. म्हणूनच मानव सेवा हीच ईश्वर सेवा आहे,’ असे प्रतिपादन मंडळाचे अध्यक्ष राजू मदनकर यांनी केले.
गोंडवाना विद्यापीठात मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन गडचिरोली : राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून येथील जिल्हा सामान्य रुग्णालय व गोंडवाना विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने मिनी मॅरोथान स्पर्धेचे आयोजन गोंडवाना विद्यापीठात करण्यात आले होते.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language